AurangabadCrimeUpdate : थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी दोन चिमुकल्यांनाच ठेवले ओलीस !! दोन महिलांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद – एक लाख रु. परत मिळवण्यासाठी अकोल्याहून दोन महिलांनी दोन चिमूकल्यांना शहरात आणून भिक मागावयास लावल्याचे धक्कादायक वृत्त आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून जनाबाई (६५) व सविता (३५) हल्ली मु.मुकुंदवाडीअशी ताब्यात घेतलेल्या या महिलांची नावे आहेत. गेल्या सात महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील राहूल पगारे, व शेख पाशा यांच्याकडून या मुलांना आणल्याचे आरोपी महिला पोलिसांना सांगत आहेत. दरम्यान पोलिसांनी चिमूकल्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
असा आला गुन्हा उघडकीस
मुकुंदवाडी परिसरातील समाज सेवक शिवराज नाथाजी वीर (४७) यांनी या महिला दोन्ही मुलांना दोन दिवसांपासून लाटण्याने मारतांना पहात होते. या प्रकरणी आरोपी महिलांना हटकल्यानंतर त्या वीर यांच्या अंगावर चवताळून आल्या आणि प्रत्येकी ५० हजार रु. येणे असलेल्या दोन इसमांकडून ही मुले आणली आहेत. तसा बाॅंडही केल्याचे सांगितले. वीर यांनी त्वरीत पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांना हा प्रकार सांगितला.पोलिसांनी दोन चिमूकल्यासहित दोन्ही महिलांना पोलिस ठाण्यात आणले असता. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सतीश व शाहरुख अशी त्या चिमूकल्यांची नावे आहेत.पोलिसांनी मुलांकडे चौकशी केली असता रोज भीक मागून आणावे लागते असे ती मुले म्हणाली तेंव्हा पोलिसही या घटनेने चक्रावून गेले असून मुलांच्या पालकांना जास्तीची मुले असल्यामुळे त्यांनी उधारी देण्या ऐवजी मुले हवाली करुन सध्यापुरता विषय संपवल्याचे आरोपी महिलांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भराटे करंत आहेत.