Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोरोनाच्या कुभांडातून तबलिगीच्या १२ जणांची मुक्तता

Spread the love

बरेली : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकणात तबलिगी जमातचे १२ जण, तर थायलंडचे नऊ नागरिक यांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे. बचाव पक्षाचे वकील मिलन कुमार गुप्ता यांनी सांगितले, की तबलिगीचे १२ जण व थायलंडचे नऊ नागरिक तसेच तामिळनाडूतील दोन जण यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता.

गेल्या वर्षी शहाजहानपूर येथे कोविड नियमांचे उल्लघन केल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर शहाजहानपूरच्या सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात साथरोग प्रतिबंध कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, परदेशी नागरिक कायदा व पासपोर्ट कायदा यातील कलमान्वये कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान बरेली येथील न्यायालयात या प्रकरणी सुनावणी करण्यात आली. गेल्या मार्चमध्ये निझामुद्दीन येथील मरकझमध्ये मुस्लिमांचा मेळावा झाला होता. त्या वेळी तबलिगी जमातचे हे लोक तेथे उपस्थित होते. त्यामुळेच नंतर करोना पसरला असा दावा करण्यात आला होता. मरकझमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात विविध देशांचे लोक उपस्थित होते. त्यात इंडोनेशिया व थायलंडच्या नागरिकांचा समावेश होता. देशभर हे प्रकरण गाजले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!