IndiaNewsUpdate : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले काळ्या टोपीचे रहस्य !!

नवी दिल्ली : मी संघाचा असलो तरी माझी टोपी उत्तराखंडमधील लोकांची पारंपरिक टोपी असलेली माझी काळी टोपी असल्याचा खुलासा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या प्रश्नाच्या उत्तरावर केला. काळी टोपी म्हटले कि , राहुल गांधी यांना वाटते वीर सावरकर हे सुद्धा संघ स्वयंसेवक होते अतसेच माझी टोपिही संघाची आहे अशी त्यांची समजूत आहे.
‘भारतीय संसद मे भगतसिंह कोश्यारी’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना कोश्यारी म्हणाले कि, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत मला तुम्ही काळी टोपी का घालता? असा प्रश्न केला होता. तेंव्हा उत्तराखंडमधील नागरिकांची ही टोपी आहे असे उत्तर मी त्यांना दिले होते. त्यावर तुम्ही संघाचे आहात म्हणून ती टोपी वापरता असे राहुल म्हणाले होते. तेंव्हा मी त्यांना पुन्हा सांगितले कि , मी संघाचा आहे मात्र ही टोपी उत्तराखंडची आहे .
संघाचा उदय होण्यापूर्वीपासून ही टोपी वापरली जाते असे कोश्यारी यांनी यावेळी स्पष्ट केले. काही महिन्यांनंतर पुन्हा राहुल यांनी याबाबत प्रश्न विचारल्याचे कोश्यारी यांनी नमूद केले. ही संघाची टोपी आहे. त्यावर मी उत्तर दिल्यावर राहुल यांनी मात्र पुन्हा त्यांचाच मुद्दा लावून धरल्याची आठवण कोश्यारी यांनी सांगितली. अशा लोकांबरोबर तुम्हाला संसदेत कामकाज करावे लागेल असे त्यांनी गोयल यांच्याकडे पाहात स्पष्ट केले.