Corona Aurangabad Update : औरंगाबाद जिल्ह्यात 22 नवे रुग्ण , 154 सक्रिय रुग्ण

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 15 जणांना (मनपा 07, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 266 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 22 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 949 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 529 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 154 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (05)
अन्य 5
ग्रामीण (17)
औरंगाबाद 1, गंगापूर 2, कन्नड 1, वैजापूर 10, पैठण 3