AurangabadCrimeUpdate- : पोलिसांना आत्महत्या करायची धमकी देत बेपत्ता झालेल्या नागरिकाचे लोकेशन उघड !!

औरंगाबाद – क्रांतीचौक पोलिस ठाण्यात मिसींग दाखल झालेल्या नागरिकाचे लोकेशन परभणी जिल्ह्यातील पूर्णा जंक्शन असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांनीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून बेपत्ता लाळीकरांविषयी माहिती मिळाल्यास क्रांतीचौक पोलिसांकडे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
बापूसाहेब लाळीकर रा.समर्थनगर असे या नागरिकाचे नाव असून लाळीकरांची १८लाखांची फसवणूक झाल्यामुळे आज सकाळी ११वा.पायी आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडले. तसा मेसेज लाळीकरांनी पोलिसआयुक्तालयाच्या आॅफिशियल व्हाॅटसअपवर पाठवला.
प्रेरणा नागरी सहकारी बँकचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, व मनगटे यांनी फसवल्याचा आरोप लाळीकरांनी मेसेजमधे केलेला आहे.पोलिसांच्या म्हणण्या नुसार लाळीकरांनी प्रेरणा नागरी सहकारी बँकेकडून अंदाजे ५/६वर्षांपूर्वी व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. त्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी निगडित व्यवसाय आहे.बँकेने फसवले अशाआशयाची तक्रार त्यांनी आरबीआय कडेही केली होती.
आरबीआय ने तक्रारीची शहानिशा करुन बँकेला क्लिनचिट दिली. व लाळीकरांची चौकशी सध्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय करंत आहे.तसेच सिडको पोलिसांनीही प्रेरणा बँकेची चौकशी केलेली आहे. लाळीकरांच्या आरोपात सत्यता नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीचौक पोलिस करंत आहेत.