Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : विमानतळावर गर्दी न करण्याचे अमेरिकेचे नागरिकांना आवाहन

Advertisements
Advertisements
Spread the love

वॉश्गिंटन : अफगाणिस्तानातील परिस्थिती पूर्णतः तणावपूर्ण असून असल्याने देशाबाहेर पाडण्यासाठी लोकांनी काबुल विमानतळावर प्रचंड गर्दी केली आहे. सध्या विमानतळावर जवळपास अडीच लाखांहून नागरिक उपस्थित आहेत. मात्र या दरम्यान अमेरिकेने मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला असून नागरिकांना काबूल विमानतळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisements

अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा झाल्यापासून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह अनेक देश काबुलमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न करत आहेत. १४ ऑगस्टपासून काबूल विमानतळावरून लोकांचं एअरलिफ्ट सुरु आहे. आतापर्यंत काबूल विमानतळावरून ८०,००० हून अधिक लोकांना बाहेर काढले आहे.

Advertisements
Advertisements

आपल्या संदेशात अमेरिकेने विमानतळाच्या आजूबाजूला जमलेल्या लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले असून काबूल विमानतळाद्वारे लोकांना देशातून बाहेर काढले जात आहे. दरम्यान काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका वाढल्याने अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि काबूल विमानतळावर न जाण्याचा इशारा दिला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी लोकांना काबूल विमानतळावरून प्रवास करण्यापासून सावध केलं आहे.

अमेरिकेने अलर्ट जारी करत म्हटले आहे की, काबूल विमानतळाबाहेर असलेल्या धोक्यामुळे अमेरिकन नागरिकांनी विमानतळावर जाणं टाळावं. याशिवाय, लोकांनी विमानतळाच्या गेटवर जाणे देखील टाळावे. पुढील सुचना येईपर्यंत नागरिकांनी या सूचनेचं पालन करावं. जे नागरिक एबी गेट, ईस्ट गेट किंवा विमानतळाच्या नॉर्थ गेटवर आहेत, त्यांनी त्वरित निघून जावे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!