WorldNewsUpdate : अफगाणी नागरीकांना तालिबान्यांचा देश सोडण्यास मज्जाव

काबुल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व स्थापन केल्याच्या भीतीमुळे अफगाणिस्तानातील अनेक नागरिक बाहेरच्या देशात स्थलांतर करीत आहे. दरम्यान हि परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही अफगाणी नागरिकांनी देश सोडून जाऊ नये असा फतवा जरी केले आहे.
मंगळवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी लोकांना हे आवाहन केले. यावेळी बोलताना तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदने सांगितले की, यापुढे अफगाण नागरिकांना आता देशाबाहेर जाता येणार नाही. बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी विमाने जिथे उतरत आहेत, त्या काबूल विमानतळावर आता अफगाण नागरिकांना जाऊ दिले जाणार नाही.
याबद्दल सीएनएनने दिलेल्या बातमीमध्ये सांगितले आहे की, या विमानतळाकडे जाणारा रस्ता अफगाण नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, इतर देशातील नागरिक ह्या रस्त्याने जाऊ शकतात आणि आपापल्या देशाच्या विमानांनी आपल्या देशातही जाऊ शकतात, अशी माहिती तालिबान्यांकडून देण्यात आली. तालिबानने सांगितलं की, अफगाण नागरिक बाहेर जाऊ लागल्याने आम्हीही नाखूश आहोत. इथल्या डॉक्टरांनी तसंच शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासकांनी देश सोडून जाऊ नये. त्यांनी इथेच राहून आपापल्या क्षेत्रात काम करावे.