MaharashtraNewsUpdate : तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आरोपांची चौकशी

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट आली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी चौकशी समिती नेमली आहे.
जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी चौकशी समिती नेमली असून या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशी समितीच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल या अध्यक्ष असून उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आणि तहसीलदार वैशाली आव्हाड या सदस्य आहेत.