Aurangabad Crime Update : नशेत रिक्षाचालकास भोसकले, एकास अटक, दोन दिवसांची पोलिस कोठडी

औरंगाबाद- मासेविक्रेत्याकडे काम करणार्या इसमाने रिक्षाचालकाचा खून करण्याचा प्रयत्न केला.गुरुवारी मध्यरात्री १२.३०वा. आझाद चौकात वरील घटना घडली. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.तर कोर्टाने त्याला २२आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फरहान फारुक शेख(३०)रा.बायजीपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे.हा मुख्यजकातनाक्यावरील मासे विक्रेत्याकडे कटर चे काम करतो.तर शेख अयाज शेख अहमद हे जखमी झाले आहेत. शेख आयाज हे घरी जळतनासाठी अरमान फर्नीचर समोरील निरुपयोगी लाकडे गुरुवारी मध्यरात्री गोळा करंत होते. तेवढ्यात त्या ठिकाणी आरोपी फरहान हा घटनास्थळी आला व शेख अय्याज यांना रिक्षातून घरी सोडण्यासाठी आग्रह करु लागला.पण शेख अय्याज यांनी नकार देताच फरहान ने चाकूने अय्याज यांना गंभीर जखमी केले.
घटनास्थळावर गर्दी जमा झाल्यानंतर गस्तीवरील जिन्सी पोलिसांनी आरोपी फरहान ला ताब्यात घेत अटक केली.पोलिसउपायुक्त दिपक गिर्हे व पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हारुण शेख पुढील तपास करंत आहेत.