IndiaNewsUpdate : धक्कादायक : सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवरच दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : एका महिलेने आणि पुरुषाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवरच स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान या दोघांनी हे पाऊल का उचलले ? याची मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांना घटनास्थळी एक ज्वलनशील पदार्थाची बाटलीही सापडली आहे. याच बाटलीतून आणलेला पदार्थ अंगावर ओतून घेत या दोघांनी स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि पुरुषाने न्यायालयाच्या गेट क्रमांक डी मधून आता घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, योग्य ओळखपत्राशिवाय आत जाण्यास सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर, आत प्रवेश न मिळाल्याने संतापलेल्या या दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटजवळ स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.मात्र, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे या दोघांचेही प्राण वाचले. आग विझवल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोघांना पोलिसांनी तत्काळ राम मनोहर लोहियारुग्णालयात दाखल केले.
Delhi | A woman, man allegedly set themselves on fire in front of Supreme Court gate number D. Area has been cordoned off. Injured persons have been taken to the Ram Manohar Lohia hospital. pic.twitter.com/sSYIuZA4EC
— ANI (@ANI) August 16, 2021