Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : मोठी बातमी : तालिबान्यांकडून अफगाणिस्तानच्या काबूलवर ताबा , अमेरिकन नागरिकांना केले जातेय एअरलिफ्ट !!

Spread the love

काबुल : दहशतवादी तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये धुमाकूळ घातला असून त्यांच्याकडून अफगाणिस्तानातील अनेक शहरांवर ताबा मिळवला आता या दहशतवाद्यांनी अफगाणिस्ताच्या काबुलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच देशातील सर्वच सीमा ताब्यात घेतल्या असल्याचे वृत्त आहे. अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी काबुलच्या कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात प्रवेश केला असून लोकांमध्ये दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान अमेरिकेने हेलीकॉप्टरच्या सहाय्याने आपल्या दूतावासातील राजकीय अधिकाऱ्यांना एयरलिफ्ट केले आहे. कॅनडा आणि अन्य देशाच्या नागरिकांनीही आपल्या देशातील नागरिकांना आपापल्या देशात परत घेऊन जाण्याची मोहीम सुरु केली आहे. या सर्व प्रकरणात अफगाणिस्थानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.त्यांनी शनिवारी म्हटले होते कि , स्थानिक नेत्यांशी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी चर्चा चालू आहे. एका वृत्तानुसार ते राष्ट्रपती पदाचा त्याग करणार होते आणि एका कमांडरकडे सूत्रे सोपवणार होते. अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला. एएफपी ने दिलेल्या वृत्तानुसार एका मंत्र्याने म्हटले आहे कि , ‘सत्तेचे शांततामय रितीने हस्तांतरण व्हावे.

जबरदस्तीने काबुलवर ताबा मिळवणार नाही : तालिबान

वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातम्यांनुसार तालिबानने सत्ता परिवर्तन करण्याची मागणी केली आहे. त्यावर अफगाणिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी शिक्कामोर्तब केले आहे. “काबुलवर हल्ला होणार नाही. सत्ता परिवर्तंन शांततापूर्वक मार्गाने होईल.”, असे गृहमंत्री मिर्जकवाल यांनी टोलो न्यूजला सांगितले , दुसरीकडे तालिबाननेही जबरदस्तीने काबुलवर ताबा मिळवणार नाही असे सांगितले आहे. सर्वांना सत्ता परिवर्तन हवे आहे. सत्ता परिवर्तन शांततेत झालं, तर कोणतंही नुकसान होणार नाही, असे तालिबानकडून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या सीमा बंद करण्याचा निर्णय

जलालाबादच्या राज्यपालांनाही सामान्य नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी तालिबान्यांशी कोणताही संघर्ष न करता आत्मसमर्पण केले असे सांगितले जात आहे. दरम्यान अफगाणिस्तानला लागून असलेल्या तोरखम सीमेवर पाकिस्ताननं कडेकोट सुरक्षा ठेवली आहे. अपगाणिस्तानातील स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद अहमद यांनी सांगितले. अफगाण पोलिसांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केल्यामुळे पाकिस्तानच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे शेख राशिद अहमद यांनी सांगितले आहे.

अफगान सरकारच्या मते स्थिती नियंत्रणात
अफगान प्रेसिडेंशियल पैलेस ट्विटमध्ये म्हटले आहे कि, काबुलच्या आसपास काही ठिकाणी गोळीबार झाला मात्र देशाचे सैन्य आणि अंतरराष्ट्रीय पक्षांच्या मदतीने स्थिती नियंत्रणात आहे. मात्र काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार तालिबानी दहशवाद्यांनी संपूर्ण काबुल शहरात चारही बाजूंनी प्रवेश केला आहे. दरम्यान अफगाणिस्थान संसदेचे स्पीकर आणि अनेक पक्षांचे नेते पाकिस्तानकडे रवाना झाले आहेत. अफगाणी सरकारने आत्मसमर्पण करावे अशी मागणी तालिबानी करीत आहेत. तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीनने म्हटले आहे आम्ही संपूर्ण माफी देणार आहोत. अफगान सरकारच्या आत्मसमर्पणानंतर आम्ही कुठल्याही बदलाच्या भावनेने काम करणार नाही.

अमेरिकेचा तालिबान्यांना इशारा
दरम्यान अमेरिकेने तालिबान्यांना इशारा दिला आहे कि , अमेरिकेने हाती घेतलेले मिशन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही नुकसान झाले तर अमेरिकेकडून कठोर कारवाई केली जाईल. अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानला नेहमीच गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना आधी बाहेर जाऊ द्यावे आणि मग काबूलवर चढाई करावी असाही तालिबान्यांचा विचार असावा असे म्हटले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!