AurangabadCrimeUpdate : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

औरंगाबाद – सिडकोतील भल्यापहाटेची माॅर्निंगवाॅकला पती सोबत जाणार्या महिलेचे मंगळसूत्र चोरीची घटना ताजी असतांनाच जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा इव्हनिंग वाॅक करणार्या गृहिणीचे ६०हजार रु. किमतीचे मंगळसूत्र दोन भामट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हिसकावले.
लीना निखील मेहता(४१)राज्ञानेश्वर नगर श्रुती रेसीडेन्सी या गुरुवारी संध्याकाळी ६.१५च्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडल्यानंतर वरील दोन भामट्यांनी मंगळसूत्र हिसकावले. घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक संतोष पाटील, अविनाश आघाव,एपीआय अजबसिंग जारवाल यांनी भेट दिली.परिसरातील सी.सी.टि.व्ही.फुटेज तपासले आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय घोरपडे करंत आहेत