Aurangabad Crime Update : सोने विक्रीसाठी आलेल्या चोरट्याकडून मंगळसूत्र चोरी उघडकीस, दोन तासात अनपेक्षित छडा

औरंगाबाद – पहाटे ५ वा. माॅर्निंगवाॅक करणार्या महिलेचे १तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावणारा सराईत चोरटा अवघ्या दोन तासात गुन्हेशाखेने पकडला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजू सुपडा चंडोल(२७अंदाजे) हा सराईत घरफोड्या गुन्हेशाखेने मुद्देमालासह अटक केला आहे.
नंदा शिवाजी गिरनारे(४०) रामयूरनगर हडको असे मंगळसूत्र हिसकवले गेलेल्या महिलेचे नाव आहे.या पहाटे ५वापती सोबंत माॅर्निंगवाॅकला घराबाहेर पडताच एक तरुण त्यांच्या समोर आला व गळ्यातील ३५हजार रु.किमतीचे मंगळसूत्र हिसकावून फरार झाला.दरम्यान गुन्हेशाखेला खबर्याने माहिती दिलीहोती की, एक इसम चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मजनू हिल परिसरात येत आहे.त्यासाठी पहाटे ५ पासून एपीआय मनोज शिंदे पथकासह मजनूहिल परिसरात सापळा लावून उभे होते.शेवटी ७वा चंडोल मजनूहिल परिसरात येताच त्याच्या खिशात एक मंगळसूत्र पोलिसांना सापडले.ते आपण पहाटेच हिसकावल्याची कबुली आरोपी चंडोल ने गुन्हेशाखेला दिली.
वरील प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब आहेर करंत आहेत.तर एपीआय मनोज शिंदे यांनी सहाय्यक पोलिसआयुक्त रविंद्र साळोखे,पोलिस निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कारवाई पार पाडलीत्यांच्या पथकात पीएसआय अमोल देशमुखही आहेत