AurangabadNewsUpdate : लाच प्रकरणात संजीवनी गर्जे यांना अटक व जामिन

औरंगाबाद -पाटबंधारे विभागातील सहाय्यक अधिक्षक अभियंता संजीवनी गर्जे यांना कारकूनाची बदली करण्यासंदर्भात दाखल झालेल्या लाचप्रकरणात जिल्हासत्र न्यायाधिश अमोघ कलोटी यांनी १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.
यावेळी अर्जदाराचे वकील अॅड.प्रशांत नागरगोजे यांनी युक्तीवाद करतांना म्हटले की, तक्रारदाराची बदलीसाठी आलेली फाईल त्यांच्या पर्यंत पोहोचलीच नाही.तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीला तपासामधे आवश्यक असलेले सहकार्य गर्जे यांनी केलेले आहे.त्यांच्या मोबाईल मधील संवादाच्या क्लिप आणि त्यांच्या आवाजाचे नमूने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला दिलेले आहेत.अर्जदाराच्या वयाचा व आतापर्यंत बजावलेल्या कर्तव्याचा विचार करता ३९वर्षे त्यांनी निष्कलंक नौकरी बजावली असून निवृत्तीसाठी केवळ सहा महिनेच बाकी आहेत. सत्रन्यायाधिश कलोटी यांनी अर्जदारांच्या वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरत जामिन मंजूर केला.
गेल्या २४ जूलै रोजी जालना पाटबंधारे येथे कार्यरत असणार्या कारकूनाने औरंगाबादेत बदली करण्यासंदर्भात सहाय्यक अधिक्षक अभियंता गर्जे यांच्याकडे अर्ज केला होता.पण गर्जे यांनी औरंगाबाद कार्यालयातील वरिष्ठ लिपीक मन्सब बावस्कर यांच्यामार्फत बदलीसाठी अर्ज केलेल्या कारकूनाकडे १०हजार रु.लाच मागून ती बावस्कर ने स्विकारली.म्हणून एसीबी ने बावस्कर ला अटक केली होती.व दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळवली होती.त्या मधे पोलिस तपासात सहाय्यक अधिक्षक अभियंता संजीवनी गर्जे यांची या लाच स्विकारण्याला संमती होती असे तपासात उघंड झाले.म्हणून एसीबीने गर्जे यांना ३०जुलै रोजीअटक केल्यानंतर १३आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडी मागितली होती.त्यावर गर्जे यांच्यावतीने अॅड नागरगोजे यांनी युक्तीवाद केला.तर सरकार तर्फे अॅड. एस.टी. शिरसाठ यांनी काम पाहिले.