AurangabadCrimeUpdate : पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाची कारवाई , बायोडिझेल विक्री करतांना ७ जण अटकेत

३ लाख २७ हजार रु.रोख व १लाख ८१हजारांचे बायोडिझेल जप्त
औरंगाबाद – चिकलठाण्यातील हिनानगरात ७जणांना पोलिसआयुक्तांच्या विशेष पथकाने आज पहाटे १२.३०च्या दरम्यान अटक केली.त्यांच्या ताब्यातून ३लाख २७हजार रु.रौख अडीच हजार लिटर बायोडिझेल ज्याची किंमत १लाख ८१ हजार रु.दोन ट्रॅक्स व अन्य साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करंत सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात गून्हा दाखल केला.
इरफानखान खमरखान(३५)रा.चिकलठाणा,जाहेद हमीद शेख (२९) रा.बायजीपुरा,जयराम लिंबाजी चव्हाण(४५),शेख तकीयोद्दीन शेख अहमद मोहियोद्दीन(३४)दोघेही रा.बीड,मोहसीनखान मोह्हमद खान(३०)शाकेरखान इफ्तेखारखान (२६ दोघेही रा.जालना व बाळासाहेब चिमाजी आहेर(३९) रा.पळसपूर पारनेरजवळ अहमदनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत.यातील प्रमुख आरोपी इरफान असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुरवठा निरीक्षक कविता गिराणे यांच्या फिर्यादीवरुन वरील गून्हा दाखल झाला आहे. पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय राहूल रोडे यांनी वरील कारवाई पार पाडली.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको औद्योगिक पोलिस करंत आहेत.