Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : वैद्यकीय शिक्षणात ओबीसींना २७ टक्के तर इडब्ल्यूएस प्रवर्गाला १० टक्के आरक्षण

Spread the love

नवी दिल्ली : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून  सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना  केंद्र सरकारकडून ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातुन वैद्यकीय शाखेत प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७  टक्के आरक्षण मिळणार आहे तर इडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण मिळणार आहे. म्हणजेच इतके टक्के जागा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. जे विद्यार्थी MBBS, ME, BDS, MDS इत्यादी कोर्सेसच्या २०२१-२०२२ किंवा या नंतरच्या कोर्सेसला प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे  हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशभरातील मेडिकलला प्रवेश घेणाऱ्या ५००० ते ५५०० विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!