Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationNewsUpdate : देशातील पाच प्रादेशिक भाषेतून अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याची मोदींची घोषणा

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्या वर्षी २९ जुलैला देशात पहिल्यांदा लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता देशातील काही राज्यांमध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम मराठीसह इतर पाच भाषांमध्ये शिकवला जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला आणि महत्त्वाची माहिती दिली आहे.

Advertisements

देशातील सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे. इंजिनिअरिंग , कॉमर्स , सायन्स अशा मोठ्या आणि ज्ञानाने  परिपूर्ण असलेल्या अभ्यासक्रमांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा हा यामागचा हेतू आहे. मात्र उच्च शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारचे भाषेचे  बंधन असू नये. विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतूनही शिक्षण घेता यावे यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील राहिलं आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Advertisements
Advertisements

याचाच  एक भाग म्हणून आता देशातील ८ राज्यांतील १४ अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये ५ भारतीय भाषांत म्हणजेच हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, आणि बांग्लामध्ये अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. अभियांत्रिकीच्या कोर्सचे ११ भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी एक टूलही विकसित केलं आहे अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना स्वतःच्या भाषेत इंजिनिअरिंगचे  शिक्षण पूर्ण करता येणार आहे. इतकेच नाही तर आता विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषा  शिकता येणार आहे. तसेच ही भाषा शिकून ज्या विद्यार्थ्यांना ऐकू त्यात नाही किंवा बोलता येत नाही अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याचे  कामही करता येणार आहे. यासाठी डिजिटल टेक्स्टबुकही तयार कारण्यात आले आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटलच्या माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!