AurangabadCrimeUpdate : दीड वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांनी वेषांतर करुन पकडला

औरंगाबाद – निशांत कोआरेटिव्ह बँकेत बनावट सोने ठेवून लाखो रुपयांचा अपहार करणार्या आरोपीला वेदांतनगर पोलिसांनी वेषांतर करुन रोपळेकर चौकातून मंगळवारी ताब्यात घेत अटक केली. संतोष बाबुराव नाईक(३१) रा.गूरुजन हाऊसिंग सोसायटी रोपळेकर चौक असे अटक आरोपीचे नाव आहे.
संतोष नाईक हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार असून बीड, जालना, व शहरातील सातारा, जवाहरनगर, जिन्सी, सिडको, सिटीचौक,क्रांतीचौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर जबरी चोरी चे गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय देवकाते,पोलिस कर्मचारी संपाळ,सनगाळे यांनी वरील कारवाईत भाग घेतला होता.