AurangabadCrimeUpdate : शाळकरी मुलाने शेजाऱ्याच्या दोन लाख चोरले

औरंगाबाद – शेजारी राहणार्या इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्याने दीड महिन्यांपूर्वी दोन लाख रु.घरातील कपाटातून चोरुन नेल्याचा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
नारायण अल्हाट रा.एन ६ सिडको असे फिर्यादीचे नाव आहे. १४ जून रोजी शेजारी राहणार्या शशिकांत सोनवणे यांच्या इयत्ता ९ वीत शिकणार्या मुलाने घरात घुसून हे पैसे चोरले.
यानंतर चोरीच्या पैशातून त्या अल्पवयीन चोरट्याने ६०/७० हजार रु. इंटरनेटवर चालणार्या फायर गेमवर उडवले. व इतरत्र खर्च केल्याचे फिर्यादी नारायण आल्हाट यांच्या लक्षात आले. त्यांनी घडलेला प्रकार अल्पवयीन चोरट्याचे वडील शशिकांत सोनवणे यांना सांगितल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकाराची खातरजमा करुन आल्हाट यांना २ लाख रु.चा चेक दिला. पण चेक बाऊन्स झाल्यामुळे आल्हाट यांनी २६ जुलै रोजी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत अल्पवयीन मुलाच्या विरोधात फिर्याद देताच गून्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय डोईफोडे करंत आहेत.