AurangabadCrimeUpdate : साधू बनून गुंगारा देणारे ‘ते’ दोन भामटे जेरबंद , ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – मुकुंदवाडीतील ज्ञानेश्वरनगरात गुंंगीचे द्रव हुंगायला लावून महिलेच्या हातातील ३२ हजाराच्या अंगठ्या काढून घेतलेल्या भामट्यांना गुन्हेशाखेने शनिवारी जवाहरनगर तरिसरातून ताब्यात घेत अटक केली. योगेश खंडू साळुंके, (२७) ता.कोथळज ता.जि.हिंगोली ,विश्वनाथ नारायण शिंदे (३२) बोरगाव जि.वाशिम अशी अटक भामट्यांची नावे आहेत.भिक्षेकरी समाजाचे हे लोक असून करमाड परिसरात हे लोक तंबु टाकून वास्तव्य करतात.
तीन दिवसांपूर्वी भावसार या महिलेच्या अंगठ्या काढून घेतल्यानंतर त्याच दिवशी या भामट्यांनी जिन्सी परिसरातील कैलासनगरात एका महिलेकडून ८ हजार रु.काढून घेतले. या प्रकरणीजिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हादाखल झाला असून शनिवारी हे भामटे जवाहरनगर परिसरात फिरंत असतांना पीएसआय अमोल देशमुख यांना खबर्याने माहिती देताच गुन्हेशाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत चौकशी केली मुकुंदवाडी आणि जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी वरील गुन्हे केल्याची कबुली दिली.
अशी आहे मोडस ऑपरेंडी
वरील आरोपी हे एकदा फसवणूक केलेल्या भागात हे पुन्हा फिरकंत नाहीत. आतापर्यंत शोकडो लोकांना वरील दोन भामट्यांनी १,२हजार, ५ हजार असा गंडा घातला. हे इयत्ता १२वी पर्यंत शिकलेले असून भोळसर लोकांना हेरुन फसवतात, घरात एकटे, दुकटे महिला पाहुन घुसतात.धोतर, भगवे नेहरु शर्ट,फेटा कपाळी गंध, कवड्यांची माळ, देवाच्या मुर्त्या अशा साहित्यासहित, अशा अवतारात फिरतात नागरिकांनी अशा अमिषाला बळी पडू नये.असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
वरील कारवाई सहाय्यक पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आघाव, पीएसआय अमोल देशमुख, पोलिस कर्मचारी सुधाकर मिसाळ, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर धर्मराज गायकवाड यांनी पार पाडली.