AurangabadCrimeUpdate : रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराने केला तरुणाचा खून

औरंगाबाद – रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराने दारुच्या नशेत संजयनगरात दारु पिलेल्या इसमाला काल रात्री १०वा.भोसकून ठार केले. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अरबाजउर्फ विशाल शेख अहमद(२४) रा.कैलासनगर असे अटक आरोपीचे नाव आहे.तर मंगेश दिनकर माळोदे (२८) रा.संजयनगर असे मयताचे नाव आहे.
मयताने आरोपी अरबाज ला दारुच्या नशेत शिवीगाळ केल्यामुळे अरबाज ने तीक्ष्ण हत्याराने मंगेशला भोसकून ठार केले. या नंतर परिसरातील नागरिकांनी जखमी मंगेशला घाटी रुग्णालयात नेल्यावर तेथील डाॅक्टरांनी मंगेशला तपासून मयत घोषित केले.दरम्यान पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीचा माग काढण्याचे आदेश दिले.पीएसआय गोकुळ ठाकूर यांनी मध्यरात्री आरोपी अरबाज ला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिन्सी पोलिस करंत आहेत