MumbaiCrimeUpdate : पॉर्नोग्राफी प्रकरण : सागरिका शोनाच्या आरोपामुळे राज कुंद्राबरोबर शिल्पा शेट्टीच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता

मुंबई : पॉर्न चित्रपट निर्मितीच्या आरोपावरून मुंबई पोलिसांच्या ताब्यात पोलीस कोठडीत असलेल्या राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मॉडेल सागरिका शोना सुमननेही धक्कादायक आरोप केले असून आपण पोलिसांना मदत करू असे म्हटले आहे. राज कुंद्रा सध्या मुंबईतील भायखळा तुरुंगात आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाशी शिल्पाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना सागरिकाने केलेल्या दाव्यानुसार राज कुंद्राची पत्नी शिल्पा ही त्याच्या कंपनीमध्ये संचालक आहे. “आपल्या कंपनीमध्ये काय सुरु आहे हे एका डायरेक्टरला ठाऊक नाही असं कसं होऊ शकतं?”, असा प्रश्न उपस्थित करत सागरिकाने यामध्ये शिल्पाचाही सहभाग असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली पाहिजे. तिला राजच्या पॉर्न रॅकेटसंदर्भात नक्कीच माहिती असणार, असेही सागरिकाचे म्हणणे आहे.
दरम्यान सागरिकाने यापूर्वी एका व्हिडीओमध्ये राज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “एका वेब सीरिजसाठी व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलवर न्यूड ऑडिशनची आपल्याकडे मागणी करण्यात आली”, असे सागरिकाने म्हटले होते . या कॉलवर उमेश नावाच्या व्यक्तीसोबतच राज कुंद्राही होते. या सर्वांनी माझ्याशी अश्लील भाषेमध्ये संवाद साधला. राज कुंद्राने आपला चेहरा मास्कने झाकला होता. मात्र मी त्याचा चेहरा ओळखला, असेही सागरिका या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. मी आतापर्यंत यासंदर्भात कुठे वाच्यता केली नव्हती. मात्र आता मुंबई पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवल्यास मी नक्कीच त्यांची मदत करणार आहे, असे ही सागरिकाने स्पष्ट केले . मला आलेला कॉल हा व्हॉट्सअप कॉल होता. नाहीतर मी तो रेकॉर्ड करुन पुरावा म्हणून पोलिसांना दिला असता, असंही सागरिकाने म्हटले आहे.