MumbaiCrimeUpdate : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरण : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अटकेत, २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना फेब्रुवारीत उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळमधून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आलेली आहे. राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पॉर्न फिल्म्स निर्मिती रॅकेट प्रकरणात पोलिसांनी सोमवारी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पॉर्न फिल्म्स निर्मितीत राज कुंद्रा मुख्य सुत्रधार असल्याचं पोलिसांनी आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे म्हटलं होतं. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. रायन जॉन थार्प असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
रायन थार्प विरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायन थार्पचे थेट राज कुंद्रा याच्यासोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. रायनही पॉर्न चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी होता. दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
असे आहे प्रकरण?
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
Maharashtra: Mumbai Police Crime Branch has arrested one Ryan Tharp from the Nerul area, in connection with a case relating to the production of Pornography.
Actress Shilpa Shetty's husband & businessman Raj Kundra was arrested yesterday in this case
— ANI (@ANI) July 20, 2021