Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सिंदिदिगर घाटात गाडी दरीत कोसळून भीषण अपघात ; 8 जणांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रवासी वाहतूक करणारी खाजगी क्रुजर गाडी नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग असणाऱ्या सिंदिदिगर घाटात दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळपास पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

Advertisements

सायंकाळच्या सुमारास ही क्रुझर गाडी या घाटातून प्रवाशांना घेऊन जात होती. अतिशय खडतर असलेल्या या भागात आताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून हा भाग तोरणमाळ सोबत जोडला गेला आहे. मात्र असे असले तरी अवघ्या सहाच महिन्यात या रस्तावर हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने आणि खडतरही असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहे. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य राबवत असुन जखमींना तोरणमाळ, म्हसावद या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर जिल्हा मुख्यालयातून पोलीस अधिक्षकांसह अनेक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!