Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट, देशाची सुरक्षा आणि सहकारावर चर्चा : जयंत पाटील

Spread the love

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.या भेटीच्या दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवार यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर काल (१६ जुलै) शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. 

जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे.

दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशना अगोदर मोदी – पवार भेटीसंदर्भात नेहमीप्रमाणे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. लोकसभेचे  सभापती ओम बिर्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचं पावसाळी अधिवेश येत्या १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत पार पडणार आहे. यामध्ये १९ दिवस कामकाज पार पडणार आहे.

सहकार आणि देशाच्या सुरक्षेविषयी चर्चा

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचे सांगितलं.  देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले असे  जयंत पाटील म्हणाले आहेत.

त्याचबरोबर यावेळी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषायांव देखील चर्चा झाली असण्याची शक्यता जयंत पाटील यांनी बोलून दाखवली. “संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवार आणि ए. के. अँटनी यांच्यासोबत काल चर्चा केली होती. त्यामुळे शरद पवारांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयांवर देखील मोदींशी चर्चा केली असेल. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचा तपशील माझ्याकडे नाही. पण मला शरद पवारांनी सांगितले  होते  की या सगळ्या विषयांवर मी पंतप्रधानांची भेटीसाठी वेळ मागितली आहे आणि मी त्यांची भेट घेणार आहे”.

देवेंद्र फडणवीसही दिल्लीत दाखल

संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांत जवळपास ३० मिनिटांची चर्चा झाली. दुसरीकडे  सध्या विरोधी देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनीही दिल्लीत दाखल होण्याआधी  गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनीही दिल्ली गाठल्याने  राज्यातील राजकारणाचा कुठलाही अंदाज व्यक्त करणे राजकीय विश्लेषकांना कठीण झाले आहे. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!