CoronaIndiaUpdate : देशात गेल्या २४ तासात ३८ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत ३८,०७९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,९४९ आणि गुरुवारी ४१,८०६ करोना बाधित आढळून आले होते. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ४३,९१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे, म्हणजेच ६३९७ सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे. देशात सध्या ४ लाख २४ हजार कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ४ लाख १३ हजार ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण ३ कोटी २ लाख २७ हजार लोकांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी १० लाख ६४ हजार लोकांना करोना संसर्ग झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १६ जुलै पर्यंत देशभरात कोरोना लसीचे ३९ कोटी ९६ लाख ९५ हजार डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी ४२ लाख १२ हजार लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नुसार आतापर्यंत ४४ कोटी २० लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारी १९.९८ लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
दरम्यान राज्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा हा जवळपास दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण ७ हजार ७६१ नवे करोनाबाधित आढळले असून त्या तुलनेत १३ हजार ४५२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. बऱ्या झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीनंतर राज्यात आजपर्यंत कोरोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांचा आकडा आता ५९ लाख ६५ हजार ६४४ इतका झाला आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६१ लाख ९७ हजार १८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख १ हजार ३३७ सक्रिय रुग्ण आहेत.
India reports 38,079 new cases and 560 deaths in last 24 hours, active caseload at 4,24,025; recovery rate rises to 97.31% pic.twitter.com/ufNAvPxo1u
— ANI (@ANI) July 17, 2021