AurangabadCrimeUpdate : एटीएम फोडण्याचा प्रयत्न , तीन संशयित ताब्यात, दोघे फरार

औरंगाबाद – मुकुंदवाडी पोलिसांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्या तिघांना चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिंधीबन काॅलनीत उत्तरप्रदेश पासिंग असलेल्या कारमधे तीन संशयितांना ताब्यात घेतले. अन्य दोघांचा शोध सिडको औद्योगिक पोलिस, गुन्हेशाखा आणि मुकुंदवाडी पोलिस करंत आहेत.
आज सकाळी ११वाजेच्या दरम्यान धूत हाॅस्पिटल समोरिल एसबीआयच्या एटीएम मधे ५संशयित घुसले.हा प्रकार एस.बी.आय.बँकेच्या अधिकार्यांना कळल्यानंतर त्यांनी इंजिनिअरचे एक पथक एटीएम कडे रवाना केले.तसेच मुकुंदवाडीपोलिसांनाही इनफाॅर्म केले.घटनास्थळी इंजिनिअर चे पथक व मुकुंदवाडी पोलिस पथक पोहोचताच चोरट्यांनी कारमधे बसून सिंधीबन काॅलनीकडे पळ काढला.त्यांचा पिक्चरस्टाईल पाठलाग करंत मुकुंदवाडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. अन्य दोघांचा शोध सुरु आहे.