MaharashtraPoliticalUpdate : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी घेतली पंकजा मुंडे यांची भेट

मुंबई : मोदी सरकारच्या विस्तारीत मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याबद्दल भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचे समर्थक नाराज असल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु असतानाच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी स्वतः पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी या भेटीत आपल्याला मुंडे साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या असल्याचे म्हटले आहे.
एकीकडे आम्ही नाराज नसल्याचे मुंडे भगिनी सांगत असताना दुसरीकडे खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू आहे. बीड आणि नगर जिल्ह्यातील समर्थकांनी पदधिकाऱ्यांकडे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामा सत्र सुरु झाल्यानंतर पंकजा मुंडे एका बैठकीत कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले. मुंडे भगिनींच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या नसल्या तरी डॉ. भागवत कराड यांनी स्वतःच पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
आज @Pankajamunde ताई दिल्ली मध्ये बैठकीसाठी आल्या त्यांची भेट घेतली…मन मोकळे झाले..मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली..मी मंत्री झालो मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत..त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या..
— Dr Bhagwat Kishanrao Karad (मोदी का परिवार) (@DrBhagwatKarad) July 12, 2021
आपल्या ट्विटमध्ये डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे कि , ” आज ताई दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळं झालं. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो. मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या.