CoronaMaharashtraUpdate : राज्यात ७ हजार २४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण , १० हजार ९७८ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ७ हजार २४३ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. हा आकडा सोमवारी ७ हजार ६०३ इतका होता. त्यामुळे नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. आज सापडलेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात आजपर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६१ लाख ६५ हजार ४०२ इतकी झाली आहे.
राज्यात सध्या १ लाख ४ हजार ४०६ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, ५९ लाख ३८ हजार ७३४ कोरोनाबाधित करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा १० हजार ९७८ अर्थात इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आज ९६.२१ टक्के इतका झाला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १९६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी हा आकडा फक्त ५३ इतका नोंदवण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजच्या आकडेवारीनंतर राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा १ लाख २६ हजार २२० इतका झाला आहे.
गेल्या २४ तासांत मुंबईमध्ये एकूण ४४१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख २८ हजार ६१५ इतका झाला आहे. मात्र, त्याचवेळी आज दिवसभरात ६०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ७ लाख ३ हजार ६७७ झाला आहे. तर दिवसभरात झालेल्या ८ मृत्यूंमुळे मुंबईतील एकूण मृतांचा आकडा १५ हजार ६४४ इतका झाला आहे.