Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : उत्तर भारतात वीज कोसळून ६१ ठार , २२ जखमी

Spread the love

नवी दिल्ली : देशातील बहुतेक राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज कोसळून ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वीज पडून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सर्वाधिक मृत्यू प्रयागराज जिल्ह्यात झाले आहेत. दरम्यान या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या घटनेमुळे दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रयागराजमध्ये वीज कोसळून सर्वाधिक १४ जणांचा मृत्यू झाला आहे. कानपूर देहात आणि फतेहपूरमध्ये प्रत्यकी ५ मृत्यू झाले आहेत. यामध्ये कौशांबीमध्ये ४ , फिरोजाबादमध्ये ३ , उन्नाव-हमीरपूर-सोनभद्रात प्रत्येकी २ ,  कानपूर नगर-प्रतापगड-हरदोई-मिर्जापूरमध्ये प्रत्येक एक मृत्यू झाला आहे. याशिवाय, २२  लोक जखमी झाले आहेत, तर २०० हून अधिक जनावरांचाही मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपद्ग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याचे निर्देशन दिले आहेत. दरम्यान, रविवारी संध्याकाळी उशिरा उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान अधिक खराब झाल्याची देण्यात आली होती. पावसाबरोबरच अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या.

राजस्थानात २० ठार

दरम्यान , राजस्थानमध्ये वीज कोसळल्याने जवळपास २० जण ठार झाले आहेत. शासनाच्या  आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये वीज कोसळल्याने मृतांचा आकडा रविवारी २० वर पोहोचला आहे. यापैकी जयपूरमध्ये११,  धौलपूरमध्ये ३, कोटामध्ये ४, झालावाडमध्ये १ आणि बारानमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यापैकी ४ लाख आपत्कालीन मदत निधीतून तर १ लाख मुख्यमंत्री मदत निधीतून देण्यात येणार आहेत. दरम्यान, वीज कोसळल्याने ज्यांनी आपला जीव गमावला त्यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!