AurangabadCrimeUpdate : ६० हजारांची लाच प्रकरण : पोलिस निरीक्षक आणि पीएसआयची चौकशी सुरु

औरंगाबाद – १जून रोजी लेबर सप्लायरकडून वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्याच्या कर्मचार्याने ६०हजार रु.लाच स्विकारल्यानंतर या प्रकरणात पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि पीएसआय सतीश पंडीत यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिसउपायुक्त दिपक गिर्हे यांना दिले आहेत. या प्रकरणात वाळूज औद्योगिक पोलिसांची चौकशी करण्यासाठी पोलिसआयुक्तांशी पत्रव्यवहार करण्याचे अधिक्षकांचे एसीबी कार्यालयाला आदेश देण्यात आले होते.पण हा पत्रव्यवहार होण्यापूर्वीच पोलिसआयुक्तांनी चौकशी सुरु करण्याचे आदेश उपायुक्त गिर्हे यांना दिले आहेत
गणेश अंतरप असे लाचखोर अटक पोलिसाचे नाव आहे. एका प्रकरणात फिर्यादी कडून गणेश अंतरप याने १लाख रु लाच मागितली.पण फिर्यादीने या प्रकरणी वरिष्ठांना भेट घ्यायची इच्छा आरोपी अंतरप कडे व्यक्त केली.म्हणून आरोपीने वरिष्ठांची भेट घ्यायची असेल तर ५०हजार रु. आणखी वाढवावे लागतील अशी धमकी देत पैशांची मागणी केली. दरम्यान फिर्यादीने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर हे गेल्या २७ मे २१ पासून वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळा लावत होते. शेवटी १जून २१रोजी सकाळी १०वा. आरोपी पोलिस गणेश अंतरप याने पावडर लावलेले ६०हजार रु. स्विकारले अंतरप ला अटक करताच तो वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची नावे एसीबी च्या अधिकिर्यांना सांगू लागला.त्यामुळे आरोपीने सांगितलेल्या नावांची शहानिशा करण्या करता एसीबी निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्यास खूप उशीर झाला होता
दरम्यान हा सगळा घटनाक्रम वरिष्ठांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करण्यासाठी पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिले होते हा सापळा पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी पार पाडला. या प्रकरणी एसीबी अप्पर पोलिस महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकार्याने
सांगितले की, सापळा रचल्यानंतर अटक केलेल्या आरोपींने वरिष्ठांची नावे घेतली तर त्यासंदर्भातील पुरावे तपासले जातात व जर ते खरे निघाले तर अटक आरोपीला माफीचा साक्षीदार करुन अटक आरोपीने सांगितलेल्या वरिष्ठांवर कारवाई केली जाते.