AurangabadCrimeUpdate : कंपनी फोडणारा चोरटा मुद्देमालासह अटक,दोन दिवसांची कोठडी

औरंगाबाद – अॅटोमिशन सिस्टीम कंट्रोल तयार करणारी कंपनी फोडणार्या रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला सी.सी.टि.व्ही.फुटेज च्या तीन दिवसात पकडून त्याच्या ताब्यातून ७०टक्के चोरलेला मुद्देमाल वाळूज औद्योगिक पोलिसांनी जप्त केला. आकाश प्रल्हाद भालेराव (२१) रा.जोगेश्वरी असे रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराचे नाव आहे.याने जुलै रोजी वाळूज औद्योगिक परिसलातील लुनावत अॅटोमेशन कंट्रोल सिस्टीम नावाची कंपनी फोडून ९लाखांचे साहात्य चोरले होते. व छावणीतील व्यापार्याला विक्री केले होते.
या प्रकरणात ५ जुलै रोजी कंपनीचे मालक कोमल लुनावत (३३) रा.समर्थनगर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.याचा तपास सुरु असतांना सी.सी.टि.व्ही.फुटेज मधे चार चोरटे दिसून आले.त्यापैकी आकाश भालेराव हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी ओळखला.त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने लुनावत यांची कंपनी फोडून त्यातील मुद्देमाल छावणीतील इलेक्र्टीक दुकानदार सय्यद आरेफ सय्यद खुर्शीद याला विकल्याचे तपासात उघंड झाले.त्यानंतर आकाश भालेराव ला अटक करंत खुर्शीदच्या दुकानातून ६लाख ३०हजारांचा मुद्देमाल जप्त करंत खुर्शीदवर गुन्हा दाखल केला.
वरील कारवाई पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यकपोलिस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, प्रशांत पोतदार यांनी पार पाडली या कारवाईत पोलिस कर्मचारी रेवणनाथ गवळी, संजय हंबीर, प्रकाश गायकवाड, अविनाश ढगे यांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास एपीआय गौतम वावळे करंत आहेत