AurangabadNewsUpdate :AurangabadNewsUpdate : दोन बायकांच्या कराटे टिचर ने विद्यार्थीनीलाही ठेवले लिव्ह इन रिलेशन शिपमधे…

औरंगाबाद – दोन बायकांच्या कराटे प्रशिक्षकाने कराटे शिकवण्याचे अमीष दाखवत तिला लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहण्यास करारनामा करत तयार केले.घरच्यांचा विरोध पत्करुन ती कराटे टिचरकडे सवतीसोबत राहण्यास निघून गेली.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे कराटे टिचर चे प्राण वाचले. मिलींद घोरपडे(४२) रा. भारतनगर असे या टिचर चे नाव आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कालच सज्ञान झालेल्या कथित विद्यार्थिनीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले.व लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहण्याचा करारनामा करुन घेतला.
या टिचर ने मुलीला घरात लपवून ठेवल्याचे समजताच आज संध्या ७.३० वा. मुलीचे पालक आणि नातेवाईक घोरपडे च्या घरी आले.व घोरपडेच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करंत होते.हा प्रकार भारतनगरातील नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करुन सांगितला. पोलिस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे यांनी पीएसआय मीरा चव्हाण व अन्य अधिकारी कर्मचार्यासह घटनास्थळी धाव घेतली.पीएसआय मीरा चव्हाण यांनी १८वर्षीय मुलीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. तर पोलिसांनी कराटे टिचर घोरपडे ला सोबंत घेत पोलिस ठाण्यात आणले.
घोरपडे याची माहिती मिळवली घोरपडेला पहिल्या पत्नीपासून १६वर्षाची मुलगी आहे.तिला सोडून दिल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले.व तिसरी विद्यार्थिनी आवडली म्हणून तिच्या पालकांकडे गेला.तुमच्या मुलीला उत्कृष्ट कराटे प्लेयर बनवतो अशा बाता मारत मुलीचे आधार कार्ड आणि इतर डाॅक्यूमेंट घेतले व लिव्ह इन चा करारनामा केला.त्यानंतर घोरपडेने व १८वर्षीय मुलीने लिव्हइन मधे राहण्याचा करारनामा पोलिस ठाण्यात सादर केला. दरम्यान नगरसेवक गायकवाड आणि इतर नागरिक पोलिस ठाण्यात जमा झाल्यामुळे कोरोना चे नियम मोडत असल्याचे दाखवत पोलिसांनी जमावाला बाहेर काढले. दरम्यान घोरपडेच्या दुसर्या पत्नीने पतीच्या नव्या नात्याला स्विकारुन १८वर्षीय तरुणीला घरी सोबंत नेले.मुलगी सज्ञान असल्यामुळे मुलीचे पालक काहीही करु शकले नाही चडफडत घरी निघून गेले.