AurangabadNewsUpdate : ‘चक्का जाम’ च्या आधी कार्यकर्ते ‘जाम’, भाजपाच्या २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

आंदोलन कायदेशीर मार्गाने हाताळणार- पोलिस उपायुक्त गिर्हे
औरंगाबाद – खा.भागवत कराड आणि आ.अतुल सावे वगळता भाजपच्या २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी चक्काजाम आंदोलनाला परवानगी नाकारत नोटीसा बजावल्या आहेत. हे आंदोलन कायदेशीर मार्गाने हाताळण्यास पोलिस सज्ज असल्याचे पोलिस उपायुक्त दिपक गिर्हे यांनी सांगितले.
भाजपचे आज राज्यभर होणारे चक्काजाम आंदोलन शहरातही होणार आहे. पण पोलिसआयुक्तालयाने परवानगी नाकारत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली.शहर आणि परिसरातून आंदोलनासाठी हजारो कार्यकर्ते येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली असून जवाहरनगर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आकाशवाणी चौकात लागला असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.बंदोबस्तासाठी गुन्हेशाखा, विशेष शाखेनेही आपली पथके तैनात केली आहेत.
दरम्यान सोमवार पासून होणार्या संभाव्य लाॅकडाऊन बाबत जिल्हाधिकार्यांशी बोलून आपण काय भूमीका घ्यायची ते ठरवू असे आ.सावे यांनी सांगितले. राज्य सरकार केंव्हाही काहीही निर्णय घेत जनतेला वेठीस धरु शकंत नसल्याचे आ. सावे शेवटी म्हणाले.