AurangabadCrimeUpdate : वटपोर्णिमेला मंगळसूत्र चोरांचा धूडगुस, दोन गुन्ह्यात तीन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

औरंगाबाद – वटपोर्णिमेच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या दोन सुवासिनींचे ६तोळ्यांंचे ३लाख रु.किमतीचे मंगळसूत्र मोटरसायकलवर आलेल्या चोरट्यांनी हिसकावले या दोन्ही घटना सी.सी.टि.व्ही.त कैद झाल्या असून या प्रकरणी क्रांतीचौक आणि सातारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत.
सकाळी १०.३० वा फिर्यादी स्वाती सुरेश काळेगावकर (५२)रा.समर्थनगर या वडाच्या पूजेसाठी जात असतांना विनाक्रमांकाच्या पल्सर मोटरसायकलवर आलेल्या चोरट्यांनी काळेगावकर यांच्या गळ्यातील ४तोळे अडीच ग्र. वजनाचे अंदाजे २लाख १०हजारांचे मंगळसूत्र सुंदरलाॅज जवळून हिसकावून पळ काढला.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तर दुसर्या घटनेत सकाळी ११.३०वा. वाल्मी परिसरातील शिक्षीका काॅलनीत राहणार्या कविता दलसिंग घुण (३४) या मोपेडवर जात असतांना मोटरसायकलवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरील दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे व डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पीऐसआय दासरे,आणि सोनटक्के करंत आहेत.