IndiaNewsUpdate : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राहुल गांधी यांनी जारी केली श्वेतपत्रिका

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला तिसरी लाट येणार असल्याने सरकारने त्यासाठी तयार राहावं असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी आम्ही श्वेतपत्रिका जरी केली असून या श्वेतपत्रिकेचा हेतू सरकारडे बोट दाखवत टीका करण्याचा नसून देशाला संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यात मदत करण्याचा आहे, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केली आहे . दुसऱ्या लाटेचा सामना करताना नेमक्या काय चुका झाल्या याची संपूर्ण माहिती या श्वेतपत्रिकेमध्ये दिली असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना संकट हाताळण्यावरुन मोदी सरकारवर टीका कऱणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. राहुल गांधी यांनी करोना संकटाचा सामना कऱण्यासाठी पक्षातर्फे श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करोनाशी लढताना करणण्यात आलेलं व्यवस्थापन वाईट होतं. यामाग अनेक कारणं होती. आम्ही ती कारण या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरी लाट आल्यास नेमकं काय करावं सांगणारी ही ब्ल्यूप्रिंट आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
The aim of this white paper on COVID19 is not finger-pointing at the government but to help the nation prepare for the third wave of infection. The whole country knows that a third wave will strike: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/5wgsBpj3jk
— ANI (@ANI) June 22, 2021
यावेळी बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ९० टक्के लोकांचा जीव वाचवता आला असता. यामागचे सर्वात मोठं कारण ऑक्सिजनचा तुटवडा होते. सध्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. पंतप्रधानांचे अश्रू लोकांचे जीव वाचवू शकत नाही पण ऑक्सिजन वाचवू शकतो देशात तिसरी लाट येणार हे स्पष्ट आहे. विषाणू सतत बदलत असून सरकारला पुढील मार्ग सुचवावा हाच या श्वेतपत्रिकेचा हेतू आहे. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली असून हे चार खांब विकसित केले आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. यामध्ये लसीकरण हा मुख्य खांब आहे. आक्रमकपणे आणि १०० टक्के लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. सरकार पूर्णपणे तयार असले पाहिजे. रुग्णालये , ऑक्सिजन, औषधं या सर्व गोष्टी उपलब्ध असले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तर दुसरा खांब श्वेतपत्रिका आहे ज्यामध्ये रुग्णांसाठी गरज असणारी औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स उपलब्ध आहेत याची खातरजमा करणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारने तयार असणे गरजेचे आहे यावर जोर देताना राहुल गांधी यांनी याचा अर्थ दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका समजून घेत त्या दुरुस्त करणे असल्याचे म्हटले आहे.