CoronaMaharashtraUpdate : राज्यात ८,९१२ नवे रुग्ण , बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ८,९१२ नवबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९ लाख ६३ हजार ४२० झाली आहे.तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. कालच्या तुलनेत या प्रमाणातही किंचित वाढ झाली आहे.
दरम्यान राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आजही अधिक आहे. आज राज्यात १० हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आता ५७ लाख १० हजार ३५६ वर पोहोचला आहे. राज्यात गेल्या २४ तासात २५७ रुग्णांचा मृत्यू झाला. आता राज्यातला मृत्यूदर १.९७ टक्के आहे. तर राज्यात सध्या एक लाख ३२ हजार ५९७ रुग्ण उपचाराधीन आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९३,१२,९२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,६३,४२० (१५.१७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,०६,५०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.