MarathaReservationUpdate : मोठी बातमी : मराठा आंदोलनात प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग

मुंबई : खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये उद्या बुधवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या पहिला मूक आंदोलनात वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचाही सहभाग राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ट्विटद्वारे कळविले आहे.
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.@Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 15, 2021
खा. छत्रपती संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवला होता. याबाबत दोघांची संयुक्त पत्रकार परिषदही झाली होती. आता या आंदोलनाला उपस्थित राहून त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे कळविले आहे. याबाबत वंचित आघाडीने ट्वीटकरून माहिती देताना म्हटले आहे कि , ‘उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत’.
दरम्यान ‘कोल्हापूरमध्ये उद्या १६ तारखेला होत असलेल्या या आंदोलनात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आंदोलनस्थळी जाणार आहोत. उद्या पालकमंत्री, हसन मुश्रीफ तिकडे जाणार आहे, ते भूमिका मांडणार आहेत. संभाजीराजेंनी सुद्धा आवाहन केलं आहे की कमीत कमी लोकांनी आंदोलनस्थळी यावं, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे याचे भान सर्वांनी बाळगावे, असंही अजित पवार जाहीर केले आहे.