Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : विश्वासू  नोकरांकडून १ किलो सोन्याचा अपहार, आरोपीला बेड्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – शहरातील लालचंद मंगलदास सोनी या सराफाकडे विश्र्वासू कारागिर म्हणून काम करणार्‍या इसमाने गेल्या सव्वा वर्षात ८४५ ग्रॅ.९०० मिली.ग्रॅ सोन्याचा ज्याची किंमत ४०लाख १८ हजार रु. आहे.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Advertisements

अमरचंद प्रेमदास सोनी (४४) रा. पानदरिबा असे अटक आरोपीचे नावआहे. अमरचंद हा गेल्या अनेक वर्षांपासून लालचंद मंगलदास सोनी या रोकडिया हनुमान काॅलनी परिसरातील पेढीवर कारागिर म्हणून काम करंत होता.१एप्रिल २० पासून ४जून २१ या काळात पेढीचे मालक उदय सोनी यांनी आरोपी अमरचंद ला ३किलो २७९ ग्रॅ. ४९०मिली ग्रॅ सोने दागिने घडवण्यासाठी दिले होते. त्यापैकी आरोपीने २किलो ४३३ग्रॅ. ५९०मिली ग्रॅ वजनाचे दागिने दिले. बाकीच्या सोन्याचा ८४५ग्र.९००मि. सोन्याचा हिशोब आरोपी अमरचंदला पेढीचे मालक सोनी यांना देता येत नव्हता. शेवटी आजउदय सोनी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर क्रांतीचौक पोलिसांनी अमरचंद सोनी ला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप शिंदे करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!