Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जाणून घ्या देशातील आजची कोरोना स्थिती 

Spread the love

नवी दिल्ली  : आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 70,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3921 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 19 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी 30 मार्च रोजी सर्वात कमी म्हणजेच, 53,480 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.  देशात सलग सातव्या दिवशी एक लाखाहून कमी दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांहून कमी झाली आहे.

देशातील आजची कोरोना स्थिती

एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 95 लाख 10 हजार 410
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 81 लाख 62 हजार 947
एकूण सक्रिय रुग्ण : 9 लाख 73 हजार 158
एकूण मृत्यू : 3 लाख 74 हजार 305

दरम्यान देशात सलग 32व्या दिवशी कोरोना व्हायरसचे नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. 13 जनपर्यंत देशभरात 25 कोटी 48 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 14 लाख 99 हजार लसीचे डोसे देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 38 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 14.92 लाख कोरोना सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली आहे. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!