MaharashtraNewsUpdate : , मी राष्ट्रपती नियुक्त खासदार , मला कुणी शिकवू नये : खासदार संभाजीराजे छत्रपती

अहमदनगर : खासदार संभाजीराजे छत्रपती आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उत्तर देताना , मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. मला कुणी काही शिकवण्याची गरज नाही, मी अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. संभाजीराजे यांनी कोपर्डी इथं जाऊन निर्भयाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
संभाजीराजे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले कि , कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले होते. याची दखल संपूर्ण देशाने घेतली. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी न्याय मिळावा अशी विनंती केली. गेली ४ वर्ष खटला न्यायलयात आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या राज्यात आपण राहात आहोत. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, स्पेशल बेंच तयार करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली.
‘मी छत्रपती महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे लोकांना मी वेठीस धरू शकत नाही. २००७ पासून मी मराठा समाजाच्या लढ्यात सहभागी आहे. हे कधी आंदोलनात आले हे मला माहिती नाही. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. जर देवेंद्र फडणवीस यांनी काही सल्ला दिला तर मी त्यावेळी बोलेल’, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला. तसंच, ‘सकाळपासून त्यांना संभाजीराजे दिसत आहे. ज्या प्रकारे सकाळी आरती लावतो तसं चंद्रकांत पाटलांचं झालं आहे. त्यांच्या मनात असं का येतंय हे मला माहिती नाही. मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे तेच याबद्दल सांगू शकतील. शिवरायांनीही कधी ज्योतिषींना मानले नव्हते. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे’, असा सणसणीत टोलाही संभाजीराजेंनी पाटलांना लगावला.
बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांपैकी एकाला तात्काळ नोकरी द्या
काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. काकासाहेबांच्या सोबतच ज्यांनी मराठा समाजासाठी बलिदान दिलं त्या सर्वांना अभिवादन करतो. सर्वांना माझी विनंती आहे की, ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं त्यांना सरकाराने शब्द दिला होता की या सर्वांना नोकरी देऊ. मात्र त्यांच्या घरातील व्यक्तींना अद्यापही नोकरी देण्यात आलेली नाहीये. बलिदान दिलेल्या नागरिकांच्या कुटुंबातील व्यक्तींना तात्काळ शासकीय नोकरी द्या. छत्रपती संभाजीराजे यांनी कोपर्डी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर औरंगाबाद येथे मराठा आंदोलनातील पहिले शहिद काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान जे खातं बंद पडत चाललं आहे अशा खात्यात नोकरी देऊ नये. तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर दोन गोष्टी त्वरित करा एक म्हणजे कुटुंबातील एकाला तात्काळ नोकरी द्या आणि दुसरं म्हणजे बंद पडणाऱ्या कुठल्याही खात्यात नोकरी देऊ नये ही शासनाला विनंती आहे. तसेच कायगावमध्ये जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे सुद्धा सरकारने मागे घ्यावेत अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली.
माझा लढा स्वतंत्र
मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. माझा लढा आजचा नाही २००७ पासून माझा हा लढा आहे . हे माझे कर्तव्य आहे त्यासाठी मी बाहेर पडलो आहे. राजकारण करण्यासाठी नाही. माझा लढा स्वतंत्र आहे. माझी कोणासोबतही तुलना करू नका ही विनंती आहे. मी कुणालाही एकत्र येण्यासाठी आवाहन करणार नाही. मी समाजाला चुकीच्या दिशेने जाऊ देणार नाही. समाजाला आपण का वेठीस धरायचं? समाजाने आपली भूमिका मांडली आहे.