Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : १० हजार ९८९ नवीन रुग्णांचे निदान , तर १६ हजार ३७९ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ९८९ नवीन रुग्णांचे निदान झाले झाले आहे तर १६ हजार ३७९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज दिवसभरात २६१ करोना मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत १ लाख १ हजार ८३३ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १ लाख ६१ हजार ८६४ पर्यंत खाली आली आहे.
राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांपर्यंत खाली आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९५.४५ टक्के इतके झाले आहे.

करोनाची आजची स्थिती

– राज्यात आज २६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
– सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४ टक्के एवढा आहे.
– आज राज्यात १०,९८९ नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात १६ हजार ३७९ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५ % एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७१,२८,०९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,६३,८८० (१५.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
– सध्या राज्यात ११,३५,३४७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ६,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६१ हजार ८६४ इतकी खाली आली आहे. त्यात सर्वाधिक १९ हजार २७५ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर मुंबई महापालिका क्षेत्रात १७ हजार ९३९, कोल्हापूर जिल्ह्यात १७ हजार ८२२ आणि ठाणे जिल्ह्यात १६ हजार ७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. मुंबईत आज ७८५ नवीन रुग्णांची भर पडली तर पुणे पालिका हद्दीत ४०४ नवे रुग्ण आढळले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!