AurangabadCrimeUpdate : १ कोटी ८२ लाखांना फसवणारा भामटा पुण्याहून दोनवर्षानंतर अटक

औरंगाबाद – परदेशी कंपन्यांमधे गुंतवणूक करुन दरमहा १० टक्के व्याज देण्याचे अमीष दाखवून जिल्ह्यातील २२जणांना १ कोटी ८२ लाख रु.चा चुना लावणार्या भामट्याला आर्थिक गुन्हेशाखेने दोन वर्षानंतर पुण्यातील वाघोलीहून अटक करुन आणले.या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
प्रशांत रमेश धुमाळ (४७) रा. सिडको असे या भामट्याचे नाव आहे.त्याने सिडको एन १ रावदेव रुग्णालयाजवळ आॅफिस थाटले होते.व त्याच्या सोबंत त्याच्या पत्नीसह दहा भामट्यांची टोळी काम करंत होती. २०१४ साली थापा मारुन अनिल जैस्वाल यांना ७ लाख रु. गुंतवणूक करायला लावली. व दरमहा ७०हजार रु.व्याज देण्याचे अमीष दाखवून फरार झाला.व पैसे परत करतेवेळी मारहाण करंत हाकलून दिल्यानंतर मे २०१९ मधे प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
हा गु न्हा दाखल झाल्यानंतर शहरातील इतर नागरिकांनी एकूण १ कोटी ८२ लाख रु.गुंतवल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हेशाखेला प्राप्त झाल्या होत्या.त्यानुसार पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल सातोदकर तपास करंत होते.खबर्याने दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणाचा म्होरक्या प्रशांत धुमाळ हा पुण्यातील वाघोली येथे असल्याचे सातोदकर यांना कळले. त्यांनी पोलिस अंमलदार नितीश घोडके, संदीप जाधव, महेश उगले, बाबासाहेब भानुसे, नितीन देशमुख यांना पाठवून प्रशांत धुमाळला बेड्या ठोकून आणले.वरील कारवाई पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली