AurangabadNewsUpdate : चंदनचोरांची आर्धी टोळी पकडली, २ लाखांचा मुद्देमाल जप्त, १५ गुन्हे उघडकीस, ५जण फरार

औरंगाबाद -गुन्हे शाखेने नारेगाव परिसरात सापळा रचून ५ चंदन चोरांना २लाखांच्या मुद्देमालासहित बेड्या ठोकल्या.त्यांच्याकडून २१ कि. चंदन जप्त केले.त्यांचे ५साथीदार फरार आहेत.
गौसखान महेमुदखान पठाण(६०) अनिसखान अयुबखान(२१)नयुमअयुब पठाण(२६)नसीबखान अलीखान(२४) सलीम मोहम्मदखान (२६) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
फुलंब्री तालुक्यातील फाजलवाडी आणि आडगाव माऊली परिसरातील ही टोळी गेल्या ४वर्षांपासून शहर व परिसरात धुमाकुळ घातला आहे.
शहरात रेकी करुन या टोळीने जिल्हाधिकारी कार्यालर, पुष्पनगरी,श्रेयनगर, कडाआॅफिस, एस.टी.वर्कशाॅप चिकलठाणा,विद्युतकाॅलनी, नाथ व्हॅलीस्कूल,समर्थनगर, एन३सिडको, मुकुंदवाडी,बाबा पेट्रोलपंप, व जालन्यातील चंदनझिरा येथून चंदनाचे झाड चोरी केल्याची कबुली दिली.
वरील कारवाई सहाय्यक पोलिसआयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख,एएसआय नंदकुमार भंडारे, पोलिस कर्मचारी किरण गावंडे, महिला पोलिस मोहिनी चिंचोलकर, नितीन देशमुख,संजयसिंह राजपूत यांनी पार पाडली