AurangabadCrimeUpdate : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, वर्षभरानंतर गुन्हा दाखल

औरंगाबाद – वर्षभरापासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्या आरोपीला वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजय पोपट बिलवाल (२७) रा.पदमपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे.वर्षभरापूर्वी पिडीतेच्या टेरेसवर क्रिकेट खेळण्याच्या चेंडूवर आरोपीने स्वता:चा मोबाईल नंबर लिहून पाठवला आणि तिच्याशी ओळख वाढवून संबंध प्रस्थापित केले . दरम्यान पिडीतेला थापा मारुन तिचे अर्धनग्न फोटो काढून ते इंटरनेटवर व्हायरल करंण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार पिडीतेच्या भावाला कळल्यानंतर गुन्हा दाखल झाला पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्यामार्गदर्शनाखाली पीएसआय लाटे करंत आहेत.