राज्यातील बारावीची परीक्षा रद्द

मुंबई : देशातील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन सीबीएसई बोर्डाची १२ वीची परीक्षा रद्द केल्यानंतर त्यापाठोपाठ आयसीएसई आणि काही राज्यांनी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दरम्यान आता महाविकास आघाडी सरकारनेही राज्यातील 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल लवकरच आदेश काढण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अखेर, राज्य सरकारने दहावीपाठोपाठ आता बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत 12वीची परीक्षा रद्द करण्याबाबात चर्चा झाली आणि प्रस्ताव मंजूर केला. आता परीक्षा रद्द करण्याबद्दल अधिकृत आदेश शासन काढण्यात येणार आहे.