IndiaNewsUpdate : ‘सायकल गर्ल’ ज्योतीच्या वडिलांचे निधन

दरभंगा : गेल्यावर्षी कोरोना काळात लॉकडाउन झाल्यानंतर अनेक संसार उघड्यावर आले. तसेच स्थलांतरीत मजुरांचा मोठा प्रश्न यावेळी उपस्थित झाला होता. हे मजूर मिळेल त्या साधनाने हजारो मैलांचा प्रवास करून घरी जात होते. अंगावार काटा आणणारा तो प्रसंग होता. अनेकजण तर पायी घरी गेले होते. यावेळी बिहारमधील दरभंगा येथील ज्योती पासवान या मुलीने आपल्या वडिलांना सायकलवर बसऊन १२०० किमी प्रवास केला होता. त्यामुळे तिला ‘सायकल गर्ल’ म्हणून ओळखल्या जाते.
दरम्यान, ‘सायकल गर्ल’ ज्योती पासवानचे वडील मोहन पासवान यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्योती पासवान गेल्यावर्षी तिच्या वडिलांना करोना काळात लॉकडाउनमध्ये सायकलवर बसऊन गुडगावहून दरभंगा येथे नेल्यामुळे चर्चेत आली होती. ज्योतीच्या कुटुंबीयांनी वडिलांच्या निधनाची पुष्टी केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या लॉकडाउन दरम्यान, जेव्हा सर्व काही बंद होते, तेव्हा लाखो लोक पायी किंवा मिळेल त्या वाहनाने घरी गेले होते. यामध्ये ज्योती देखील होती. दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडा ब्लॉकमधील सिरहूली खेड्यातील १३ वर्षीय ज्योती लॉकडाउन दरम्यान तिच्या वडिलांना सायकलवर बसऊन गुडगावहून ८ दिवसांत दरभंगा येथे गेली होती.