CoronaMaharashtraUpdate : धक्कादायक : नगर जिल्ह्यात सर्वाधिक मुलांना कोरोनाने गाठले !!

अहमदनगर : देशात सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरु असताना अहमदनगरमध्ये तब्बल ८८८१ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ७७ हजार ९२९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ८८१ जण हे १८ पेक्षा कमी वयाची बालकं आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबतची माहिती दिली.
चिंताजनक बाब म्हणजे लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. मे महिन्यात नगर जिल्ह्यातील लहान वयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8881 इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. याबरोबरच जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोणत्या वयोगटातील मुलांना कोरोना?
नगर जिल्ह्यात मे महिन्यात ७७ हजार९२९ इतके कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 18 वर्षाखालील रुग्णांची संख्या ८८८१इतकी आहे. ० ते १ वयोगटातील ८५ रुग्ण,२६९४ रुग्ण हे १२ वर्षापर्यंतचे आहेत, तर १८ वर्षापर्यंतच्या रुग्णांची संख्या ६१०२ इतकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान एका महिन्यात जवळपास ९ हजार बालकांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.