#AurangabadCrimeUpdate: माजिदचे तीन खुनी पकडले एक अल्पवयीन

औरंगाबाद : गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केल्यामुळे नाल्याजवळ नेत खून केल्याची कबुली. मयत गुन्हेगार माजिदच्या खुन्यांनी छावणी पोलिसांना दिली. या प्रकरणात दोघांना आज पहाटे (रविवारी)३वा. अटक केली असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली. शेख परवेज शेख समद (२१) फळविक्रेता,रा.कोतवालपुरा बारापुल्ला गेट, अरबाजखान वाईजखान (२१) यांना अटक केली तर अल्पवयीन आरोपी हा साडेसोळा वर्षाचा आहे.
मयत माजिद ने वरील तिन्ही आरोपी शुक्रवारी मध्यरात्री पबजी खेळत असताना त्यांना अडवून पैशाची मागणी केली. नाहीतर चाकूने खलास करु असे धमकावले. त्यामुळे तिघांनी मयताला पैशे देतो तिकडे चल असे म्हणत बारापुल्ला गेटजवळ आणले व शुक्रवारी पहाटे चार वा. माजिद चे कपडे काढून त्याला तिघांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत जबर दुखापत झाल्याने खाली कोसळलेल्या माजिदच्या डोक्यात सज्ञान आरोपींनी डोक्यात भलामोठा दगड घालून मारुन टाकले. या घटने दरम्यान अल्पवयीन आरोपीने घाबरुन झालेला प्रकार त्याच्या निकटवर्तीयांना सांगितला.त्यामुळे घडलेल्या गुन्ह्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या कारवाईत पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोज पगारे व पीएसआय सचिन वायाळ यांनी सहभाग घेतला होता.