CoronaMaharashtraUpdate : काळजी घ्या : रुग्णसंख्या वाढ घटू लागली पण मृत्यूच्या संख्येत वाढ

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत असली असली तरी मृत्यूच्या संख्येत नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. गुरुवारी (27 मे) रोजी 21 हजार 273 असलेली कोरोनाबाधितांची संख्या आज 20 हजार 295 हजारावर अली असून गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्येत घट झाली आहे. दरम्यान आज तब्बल 31 हजार 964 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु गेल्या 24 तासात 444 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.27 मे रोजी हीच संख्या 425 इतकी होती. यावरुन गेल्या दोन दिवसात मृतांची संख्या वाढली आहे.
सध्या राज्यात 2 लाख 46 हजार सक्रिय रुग्ण असून बरे होण्याचे प्रमाण 93.46 टक्के इतके आहे. तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण 1.63 टक्के आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या जास्त असल्याने नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. येत्या 1 जूननंतर रेड झोन व्यतिरिक्त इतर भागात लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी निष्काळजीपणा न करता योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
दरम्यान 10 जूननंतर जिल्हा बंदी उठविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे 1 जून पासून रुग्णसंख्या शिथिल होण्याची शक्यता आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 1359 जणं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग 399 दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज 1048 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.